
सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हा सामना विशाखापट्टणममध्ये सुरु आहे. या सामन्यामध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलेले पहिले चार फलंदाज लागोपाठ बाद झाले. मिचेल स्टार्कच्या ओव्हरमध्ये चारही फलंदाज माघारी परतले.
अभिषेक शर्मा मिचेल स्टार्कच्या पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला. पुढे लागोपाठ इशान किशन, नितीश कुमार रेड्डी आणि ट्रेव्हिस हेड सुद्धा बाद झाले. चौथी विकेट पडली तेव्हाची हैदराबादची धावसंख्या ३७ इतकी होती. याच दरम्यान पटापट प्रमुख चार फलंदाज तंबूत परतले. पुढे इन फॉर्म क्लासेन देखील बाद झाला. यामुळे हैदराबाद संघाची मालकिण काव्या मारन सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
हैदराबादने पहिल्या सामन्यामध्ये राजस्थानच्या विरोधात २८६ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२५ सुरु होण्यापूर्वीच हैदराबादने 'अबकी बार ३०० पार'चा नारा दिला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबाद इनिंगमध्ये ३०० धावा करणार अशा चर्चा होत्या. पण दुसऱ्या सामन्यानंतर लगेच तिसऱ्या सामन्यामध्ये देखील हैदराबादची फलंदाजी ढेपाळल्याने हैदराबाद संघाला आणि संघाची मालकिण काव्या मारनला नेटकरी ट्रोल करत आहेत.
हैदराबादची प्लेईंग ११ -
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
दिल्लीची प्लेईंग ११ -
जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.