
आयपीएल २०२५ स्पर्धेतील स्पर्धेतील सर्वात मजबूत बॅटिंग लाईनमअपबद्दल बोलायचं झालं, तर हैदराबादचा संघ अव्वल स्थानी आहे. हा संघ जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो, त्यावेळी त्यांचं टार्गेट ३०० धावा इतकं असतं. मात्र या नादात त्यांना सुरुवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही हैदराबादला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले आहेत.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील १० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हैदराबादला या सामन्यात हवी तशी सुरुवात करता आली नाही. हैदराबादला लागोपाठ ४ धक्के बसले.
या सामन्यात हैदराबादकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड ही जोडी मैदानावर आली होती. मात्र या जोडीला ताबडतोड सुरुवात करुन देता आली नाही. हेडने शॉट मारुन १ धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिषेक शर्मा धाव घेण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं.
त्यानंतर हेडने काही फटके खेळून संघाची धावसंख्या हलती ठेवली. मात्र दुसऱ्या बाजूने हैदराबादला एका पाठोपाठ एक धक्के बसत होते. पहिल्याच सामन्यातील शतकवीर इशान किशन या डावात २ धावांवर तंबूत परतला. तर नितीश कुमार रेड्डी शून्यावर बाद झाला. या डावात हैदराबादची जबाबदारी हेडच्या खांद्यावर होती. मात्र तो ही दबावात येऊन बाद झाला. त्याला या डावात २२ धावा करता आल्या. दिल्लीकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क चमकला. त्याने सुरुवातीलाच हैदराबादला ३ मोठे धक्के दिले.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिंस (कर्णधार), ईशान किशन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अंकित वर्मा, हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक मनोहर, झे. अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी,
दिल्ली कॅपिटल्स - अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, जॅक फ्रेझर, फाफ डुप्लेसी, अभिषेक पॉरेल, त्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.