
MI Vs GT IPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या आयपीएल २०२५ आजच्या सामन्यामध्ये गुजरातने ३६ धावांनी मुंबईवर विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत गुजरातने १९६ धावा केल्या होत्या. तर मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्समध्ये १६० धावा केल्या. आयपीएल २०२५ मध्ये गुजरातने पहिली विजयी सलामी दिली.
गुजरात टायटन्सकडून सलामीला शुबमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. त्यांनी पावरप्लेच्या शेवटी ६६ धावा केल्या. पुढे शुबमन गिल ३८ धावा करुन परतला. जॉस बटलरने ३९ धावा केल्या. साई सुदर्शनने सर्वात जास्त अशा ६३ धावा केल्या. शाहरुख खान बाद झाल्यानंतर गुजरातची फलंदाजी काहीशी ढेपाळली. गुजरातने एकूण १९६ धावा केल्या.
दुसऱ्या बाजूला मुंबईचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन लवकर बाद झाले. त्यामुळे मध्यल्या फळीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिलक वर्माने सावधगिरीने ३९ धावा काढल्या. त्यानंतर ४८ धावा करुन सूर्यकुमार यादव आणि ११ धावा करुन हार्दिक पंड्या माघारी परतले. तोपर्यंत सामना मुंबई इंडियन्सच्या हातून निसटला होता.
मुंबईची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू
गुजरातची प्लेईंग ११ -
शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकिपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.