
Sunrisers Hyderabad Kavya Maran : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या आजच्या सामन्यामध्ये दिल्लीचा विजय झाला. तर हैदराबादच्या संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यात विक्रमी विजय मिळवल्यानंतर हैदराबादने पुढचे दोन्हीही सामने गमावले आहेत. याच दरम्यान हैदराबादची मालकीण काव्या मारनने घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा होत आहे.
सनरायजर्स हैदराबाद संघाचे सामने त्यांच्या घरच्या स्टेडियममध्ये म्हणजेच हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले जाणार नसल्याचा निर्णय काव्या मारनने घेतला आहे. यामागील कारण आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी सुरु असलेला वाद. HCA (हैदराबाद क्रिकेट असोसिएशन) चे वरिष्ठ अधिकारी हैदराबादचे आयपीएलमधील मोफत तिकीट मिळवण्यासाठी धमक्या देत असल्याचे काव्या मारन आणि हैदराबादच्या संघाने म्हटले आहे.
'आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादचे सामने मोफत पाहायला मिळावेत यासाठी HCA चे काही अधिकारी धमक्या देत, ब्लॅकमेल करत आहेत', असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे SRH च्या व्यवस्थापनाने सर्व सामने हैदराबादमधून हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयपीएलमध्ये हैदराबादचे पुढील सामने दुसऱ्या स्टेडियममध्ये होतील असे म्हटले जात आहे.
काही माध्यमांच्या अहवालांनुसार, हैदराबाद संघाचे जनरल मॅनेजर श्रीनाथ टीबी यांनी HCA चे खजिनदार सीजे श्रीनिवास राव यांना पत्र लिहून तक्रार नोंदवली. 'HCA असोसिएशन, त्यातही असोसिएशनचे अध्यक्ष, यांच्याकडून मिळणाऱ्या अव्यवसायिक धमक्या आणि कृती पाहता, त्यांना SRH संघाला हैदराबादच्या स्टेडियममध्ये खेळू द्यायचे नाहीये. असे असल्यास हे आम्हाला लेखी स्वरुपामध्ये कळवा. आम्ही हा मुद्दा बीसीसीय, तेलंगणा सरकार आणि व्यवस्थापनासमोर मांडू आणि सामने पर्यायी स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेऊ', असे श्रीनाथ टीबी यांच्या पत्रात लिहिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.