गॅस सिलिंडरचा तुटवडा, हॉटेल व्यावसाय अडचणीत, अखेर घेतला मोठा निर्णय, वाचा नेमकं केलं काय?

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये कमर्शियल गॅसचा पुरवठा तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. काही हॉटेलमध्ये गॅस संपल्याने चुली पेटवून स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण दिले जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar gas shortage : आखाती देशाच्या युद्धाची झळ आता महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील सामान्य माणसाला बसायला सुरुवात झालेली आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिक औद्योगिक क्षेत्रातील लागणारा गॅस पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम अनेक हॉटेलवर झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही हॉटेलमधील गॅस संपल्यामुळे आज अखेर चुली पेटवून ग्राहकांना अन्न दिलं जातंय. 3 दिवसांपासून व्यावसायिक गॅस वितरण बंद असल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत. जो साठा होता तो आता संपत चालल्याने चुली पेटवावी लागतायत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये काही हॉटेलमधील गॅस संपल्यामुळे आज अखेर चुली पेटवून ग्राहकांना अन्न दिले जात आहे. तीन दिवसांपासून व्यावसायिक गॅस वितरण बंद असल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत. जो साठा होता तो आता संपत चालल्याने चुली पेटवावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com