IPL 2025 Aniket Varma X (Twitter)
Sports

IPL 2025 : लहान वयात आईला गमावलं, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर काकानं सांभाळलं, हालाखीच्या स्थितीतून 'या' खेळाडूनं SRH संघात स्थान मिळवलं

SRH VS RR : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात आयपीएल २०२५ चा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादच्या संघात अनिकेत वर्माचा समावेश करण्यात आला आहे.

Yash Shirke

आयपीएल २०२५ चा दुसरा सामना सुरु आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना खेळला जात आहे. हैदराबादच्या प्लेईंग ११ मध्ये अनिकेत वर्मा या २३ वर्षीय खेळाडूला संधी देण्यात आली आहे. अनिकेत वर्माने खूप संघर्ष करुन आयपीएलमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने एमपी प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी केली होती.

अनिकेत वर्मा मध्यप्रदेशच्या भोपालचा आहे. अनिकेत ३ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. वडिलांनी दुसरं लग्न केल्याने अनिकेत बालपणीच पुरका झाला. अनिकेतच्या काकाने त्याचा सांभाळ केला. ज्यावेळेस अनिकेत १० वर्षांचा होता, तेव्हा काकाने एका क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याला दाखल केले. हालाखीच्या स्थितीमध्ये अनिकेत वर्माचे बालपण गेले. अनिकेतचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या काकाने खूप मेहनत घेतली.

आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबादच्या संघाने अनिकेत वर्मावर ३० लाख रुपयांची बोली लावली. प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याने तुफानी खेळी केली. त्याने कामिंदू मेंडिसच्या ओव्हरमध्ये चार बॉल्समध्ये सलग चार षटकार मारले होते. त्याने फक्त १७ चेंडूंमध्ये ४६ धावा करत स्वत:ची क्षमता सिद्ध करुन दाखवली.

एमपी प्रीमियर लीगमध्ये अनिकेत वर्मा चमकला होता. त्याने फक्त ३२ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या होत्या. आजच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यामध्ये अनिकेतचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्येही अनिकेत चांगली फलंदाजी करेल अशी सनरायजर्स हैदराबादच्या संघाला आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT