Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे...; मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल

Minister Narhari Zirwal: महाराष्ट्राचे मंत्री नरहरी झिरवाल यांच्या मंत्रालय कार्यालयात लाच घेताना एसीबी अधिकाऱ्यांनी एका कर्मचाऱ्याला अटक केली. मंत्रालयातील लाचखोरीचे रेट कार्ड व्हायरल झाले आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील एक भ्रष्टाचाराच्या व्हिडिओ समोर आल्यानंतर आता लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल झालंय. फाईल्सवर कोड भाषेतून किती लाच द्यायची हे सांगितलं जातं. माध्यमांच्या हाती आता मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड लागलंय. फाईलवर एक लाईन असेल तर ५० हजार रुपये द्यायचे आणि दोन लाईन असतील १ लाख रुपये द्यायचे असा कोड भाषेतून लाच दिली जाते.

मंत्रालयात राजेंद्र ढेरिंगे या कर्मचाऱ्याला ३५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मंत्रालयात लाचखोरीचा व्यवहार कसा चालतो, याचा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. निर्मल शर्मांनी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला होता. यामध्ये मंत्री नरहरी झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचाही सहभाग महत्वाचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या फाईल्सवर लाल-हिरव्या पट्ट्या मारुन त्यावर कोणाला किती पैसे द्यायचेत, हे विशेष खूण करुन लिहिले जायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com