
आयपीएलच्या १८ व्या सीझनमधील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगला आहे. राजस्थान विरुद्ध हैदराबाद या सामन्यामध्ये टॉस जिंकत राजस्थान रॉयल्सच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचे ठरवले. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने युवा खेळाडू रियान परागकडे नेतृत्त्वाची संधी सोपवण्यात आली आहे. मैदानात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरले.
हैदराबादच्या संघाने पावर प्लेमध्ये ९४ धावा केल्या. त्यांचा सलामीवीर अभिषेक शर्मा ११ चेंडूंमध्ये २४ धावा करत माघारी परतला. त्याच्या जागी ईशान किशन खेळण्यासाठी आला. किशन आणि हेड हे दोघेजण दमदार फलंदाजी करत आहेत. याच दरम्यान हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये पॅट कमिन्स त्यांच्या टीममेट्ससह मंचावर बसलेला आहे. त्यांच्यासमोर हैदराबाद संघाचे चाहते बसले आहे. चाहत्यांकडे पाहून यंदा ३०० पेक्षा जास्त धावा होणार असल्याचे म्हणतो. ३ बोट दाखवून 'अबकी बार ३०० पार' नारा पॅट कमिन्सने दिल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. मागच्या सीझनमध्ये हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त धावसंख्या करण्याचा विक्रम रचला होता.
सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ११ -
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, सिमरजीत सिंह
राजस्थान रॉयल्स प्लेईंग ११ -
रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, शिमरन हेटमायर, शुभम दुबे, ध्रुव जरेल, फजहलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, महिश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.