Rinku Singh: एका किंगसमोर दुसऱ्या किंगचा अपमान? रिंकूने शेकडो चाहत्यांसमोर विराटला केलं इग्नोर, नेटकरी संतापले

Rinku Singh Virat Kohli: आयपीएल 2025 चा थरार अखेर सुरू झाला असून, पहिल्या सामन्यानंतर आरसीबीचे चाहते प्रचंड आनंदात आहेत. या हंगामाची सुरुवात धडाक्यात झाली आहे. उद्घाटन समारंभात अनेक नामवंत सेलिब्रिटींनी आपल्या अप्रतिम परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली.
Rinku Singh Virat Kohli
Rinku Singh Virat Kohlisaam tv
Published On

आयपीएल २०२५ ला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यानंतर आरसीबीचे चाहते फार खूश आहेत. या सिझनची सुरुवात एका उत्तम शैलीत झाली. यंदाच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक सेलिब्रेटींनी उद्घाटन समारंभात त्यांच्या परफॉर्मन्सने घायाळ केलं. यावेळी दिशा पटानीने एक अद्भुत नृत्य सादर केलं तर गायिका श्रेया घोषालने तिच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या सेरेमनीमध्ये विराटच्या डान्सनेही चाहत्यांचं लक्ष वधून घेतलं. उद्घाटन समारंभात विराट कोहली शाहरुख खानसोबत पठाण सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसला. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंग देखील स्टेजवर उपस्थित होता. मात्र यावेळी एक अशी घटना घडली ज्यामुळे कोहलीचे चाहते काहीसे नाराज झालेत.

Rinku Singh Virat Kohli
Ajinkya Rahane: कुठे झाली नेमकी चूक? सामन्यानंतर अजिंक्य रहाणेने सांगितली पराभवाची कारणं, 'या' खेळाडूंवर फोडलं खापर!

रिंकु सिंहने कोहलीला केलं नाही हँडशेक

यावेळी झालं असं की, ज्यावेळी रिंकू सिंग स्टेजवर येते तेव्हा तो शाहरुख खानशी हँडशेक करतो। त्यानंतर तो त्याला मिठी मारतो. दुसरीकडे विराट कोहली जिथे उभा असतो तिथे जाऊ रिंकून पुढे निघून जातो. कोहली त्याच्याशी हँडशेक करण्यासाठी वळतो, पण रिंकू त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि पुढे जातो. दरम्यान हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान हा व्हिडीओ पाहून चाहते संतापले असून एका किंग समोर दुसऱ्या किंगला इग्नोर केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Rinku Singh Virat Kohli
Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

विराट कोहलीची उत्तम फलंदाजी

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआर टीमने १७४ रन्स केले. यानंतर, आरसीबीने १६.२ ओव्हर्समध्ये हे लक्ष्य अगदी सहज गाठलं. आरसीबीकडून विराट कोहलीने ५९ रन्स केले. तर फिल सॉल्टने ५६ रन्सचं योगदान दिलं. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ९५ रन्सची पार्टनरशिप केली आणि आरसीबीच्या विजयाचा पाया रचला.

Rinku Singh Virat Kohli
CSK vs MI : ईशानची जागा कोण घेणार? रोहितसोबत सलामीला कोण उतरणार? 'या' 3 खेळाडूंची नावं चर्चेत

कृणाल पांड्याची गोलंदाजी चमकली

केकेआर टीमकडून अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांनी जबरदस्त फलंदाजी केली. नरेनने ४४ रन्स केले. तर कर्णधार रहाणेने ३१ चेंडूत ६ चौकार आणि चार लांब सिक्स लगावले. त्याने ५६ रन्सची शानदार खेळी केली. अंगकृष रघुवंशीने ३० धावा केले. केकेआरने १७४ रन्स केले. यावेळी आरसीबीकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com