Virat Shahrukh Dance Video : 'झूमे जो पठाण..' मॅचपूर्वी शाहरुख खानसोबत विराट कोहलीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli Shahrukh Khan : आयपीएल २०२५ च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये शाहरुख खानच्या विनंतीला मान देत विराट कोहली पठाण गाण्यावर थिरकला. त्या दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Shahrukh Dance Video
Virat Shahrukh Dance VideoX (Twitter)
Published On

IPL 2025 : आयपीएलच्या नव्या सीझनला सुरुवात झाली आहे. पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाहरुख खानने होस्टिंगची जबाबदारी पार पाडली. याच कार्यक्रमादरम्यान शाहरुख खान आणि विराट कोहली यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला शाहरुख खान, श्रेया घोषाल, दिशा पटानी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. सामना सुरु होण्यापूर्वी शाहरुख खानने मंचावर रिंकू सिंह आणि विराट कोहली यांना बोलावले. त्यांच्यामध्ये मंचावरच मज्जामस्ती सुरु होती. गप्पांनंतर रिंकू शाहरुख सोबत 'लुट पुट गया' या गाण्यावर थिरकताना दिसला.

Virat Shahrukh Dance Video
Virat Kohli : कोहलीवरचं 'विराट' प्रेम! हातात RCB चा फ्लॅग, अंगात 18 नंबरची जर्सी; व्हिडीओ होतोय व्हायरल

ज्या वेळेस मैदानात गोलंदाज विकेट घेतात, कोणी षटकार मारला किंवा चांगला झेल घेतला, सामना जिंकता, तेव्हा विराट नाचून सेलिब्रेट करतोस. आता माझ्या पठाण चित्रपटाच्या गाण्यावर थोडं नाचून दाखव ना.. असे शाहरुख विराटला म्हणाला. त्यानंतर विराट आणि शाहरुख यांनी मिळून 'झूमे जो पठाण'वर हूक स्टेप करत ठेका धरला.

विराट कोहली आणि शाहरुख खान यांचा डान्सिंग व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान केकेआर आणि आरसीबी या सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना जिंकेल असा विराट कोहलीच्या चाहत्यांना विश्वास आहे.

Virat Shahrukh Dance Video
RCB साठी वाईट बातमी; माजी क्रिकेटपटूच्या भयंकर भविष्यवाणीनं धडधड वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com