RR vs RCB,Playing XI 
क्रीडा

RR vs RCB,Playing XI: RCB चं टेन्शन वाढणार! महत्वाच्या सामन्यात RR च्या ताफ्यात विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री

RR vs RCB, Playing 11 Prediction: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात राजस्थान आणि बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत .

Ankush Dhavre

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आमने सामने येणार आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ सनरायझर्स हैदराबाद संघासोबत दोन हात करताना दिसेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास इथेच थांबणार आहे. दरम्यान जाणून घ्या कशी असेल या दोन्ही संघांची प्लेइंग ११

राजस्थान रॉयल्स संघाने या स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. या संघाने सुरुवातीच्या ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. मात्र गेल्या पाचही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जोस बटलर संघाबाहेर गेल्यापासून राजस्थानचा संघ अस्थिर असल्याचं दिसून आलं आहे. तर यशस्वी जयस्वालची बॅट देखील शांत आहे. या सामन्यासाठी शिमरोन हेटमायरचा संघात समावेश केला जाऊ शकतो. तर सलामीला येणाऱ्या कॅडमोरला संघाबाहेर बसावं लागेल.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात कुठलाही बदल होण्याची शक्यता खुप कमी आहे. कारण हा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. गेल्या ६ पैकी ६ सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवला आहे. विल जॅक्स संघाबाहेर झाल्यानंतर त्याच्याऐवजी ग्लेन मॅक्सवेलचा संघात समावेश करण्यात आला होता. त्याने फलंदाजीत आणि गोलंदाजीतही बहुमूल्य योगदान दिलं होतं.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार,यष्टीरक्षक), रियान पराग, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युजवेंद्र चहल, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल,

इम्पॅक्ट प्लेअर- नांद्रे बर्गर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन,दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद सिराज, महिपाल लोमरोर,

इम्पॅक्ट प्लेअर - स्वप्निल सिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT