RR vs RCB Weather Report: राजस्थान -बंगळुरु सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा हवामानाची लेटेस्ट अपडेट

Royal Challengers Bengaluru VS Rajasthan Royals, IPL 2024 Match Weather Report: आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
RR vs RCB, Eliminator: राजस्थान -बंगळुरु सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा हवामानाची लेटेस्ट अपडेट
IPL 2024 Eliminator Royal Challengers Bengaluru vs Rajasthan Royals MatchTwitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना दिसेल.

तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत फायनलमध्ये धडक दिली आहे. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या.

RR vs RCB, Eliminator: राजस्थान -बंगळुरु सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा हवामानाची लेटेस्ट अपडेट
KKR vs SRH, Qualifier 1: हैदराबादचा संघ नेमका कुठे कमी पडला? कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलं पराभवाचं कारण

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ ३१ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने १५ आणि राजस्थान रॉयल्स संघाने १३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध खेळताना २१७ धावा ही राजस्थान रॉयल्सची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना २०० धावा ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

कसं असेल हवामान?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या दिवशी अहमदाबादमधील तापमानाचा पारा ४५ डिग्रीपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर संध्याकाळी तापमान कमी होईल. accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.

RR vs RCB, Eliminator: राजस्थान -बंगळुरु सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा हवामानाची लेटेस्ट अपडेट
Mitchell Starc: मिचेल स्टार्कला याच दिवसासाठी KKR ने २४.७५ कोटी मोजले; हा व्हिडिओ कितीही वेळा बघा, नजर हटणारच नाही!

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११ (RR vs RCB 2024 Match Playing 11)

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार,यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, संदीप शर्मा, अवेश खान, युजवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर- नांद्रे बर्गर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद सिराज

इम्पॅक्ट प्लेअर - स्वप्निल सिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com