IPL 2024 Playoffs scenario after mi vs srh match sunrisers hyderabad tension increased amd2000 twitter
क्रीडा

IPL Playoffs Scenario: मुंबईच्या विजयाने हैदराबादचं टेन्शन वाढलं! तर या संघांचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा

IPL Playoffs Scenario After MI vs SRH Match: मुंबईने सनरायझर्स हैदराबादला ७ गडी राखून धूळ चारली आहे. दरम्यान या सामन्यानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर शानदार विजय मिळवला आहे. मुंबईचा हा १२ सामन्यांमध्ये चौथा विजय ठरला आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १७४ धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. दरम्यान या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सनरायझर्सविरुध्दच्या सामन्यात विजय मिळवून सर्वात शेवटी असलेल्या मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत नवव्या स्थानी झेप घेतली आहे. आतापर्यंत या संघाने १२ सामने खेळले आहेत. यापैकी केवळ ४ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर ८ सामने गमवावे लागले आहेत. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी पोहोचला आहे. या संघाने ११ सामने खेळले असून केवळ ४ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे गुण समान आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट चांगला असल्याने या संघाने गुणतालिकेत आघाडी घेतली आहे.

मुंबईच्या विजयाचा कोलकाता नाईट रायडर्स संघाला फायदा झाला आहे. कारण हा संघ अव्वल स्थानी कायम आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केवळ १ सामना जिंकायचा आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला देखील १ सामना जिंकायचा आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादने प्रत्येकी ६-६ सामने जिंकले आहेत. हे दोन्ही संघ गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.

इतर संघांबद्दल बोलायचं झालं तर, १२ गुणांसह लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सातव्या, पंजाबचा संघ आठव्या मुंबईचा संघ नवव्या आणि गुजरातचा संघ सर्वात शेवटी गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

SCROLL FOR NEXT