hardik pandya  saam tv news
Sports

IPL 2024: हार्दिक पंड्या होणार मुंबईचा कर्णधार? आयपीएल २०२४ मध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता

Hardik Pandya Captain Of Mumbai Indians: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार होऊ शकतो. तर रोहित शर्मा गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.

Ankush Dhavre

Hardik Pandya Latest News:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी फ्रँचायझिंनी खेळाडूंची ट्रेडिंग प्रक्रिया सुरू केली आहे. या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा गुजरात टायटन्समध्ये जाऊ शकतो. रोहितऐवजी आपल्याच संघातील माजी खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री होऊ शकते.

जर हा ट्रेड यशस्वी झाला तर आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. तर रोहित शर्मा गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.

मात्र माध्यमातील वृत्तात असंही म्हटलं गेलं आहे की,जोफ्रा आर्चरला हार्दिक पंड्यासोबत ट्रेड केलं जाऊ शकतं. असं झाल्यास, जोफ्रा आर्चर मुंबई नव्हे तर गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना दिसून येईल. तर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसून येईल. (Latest sports updates)

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.

तर दुसरीकडे नवखा गुजरातचा संघ आयपीएल २०२२ स्पर्धेत पहिल्यांदाच खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. हार्दिक पंड्याला या संघाचे कर्णधारपद दिले गेले होते. त्याने पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवलं. तर २०२३ मध्ये गुजरातने आयपीएलची फायनल गाठली. मात्र फायनलमध्ये चेन्नईकडून गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला होता.

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सला २०१३,२०१५,२०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली होती. मुंबईने मिळवलेल्या ४ विजयांमध्ये हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्यानंतर तो गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT