आयपीएल २०२४ स्पर्धेत आज १४ वा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदाच आपल्या होमग्राऊंडवर खेळण्यासाठी उतरणार आहे. मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्स संघासोबत होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबईला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. तर राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? कशी असेल खेळपट्टी? जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हेड टू हेड रेकॉर्ड..
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ २८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने १५ तर राजस्थान रॉयल्स संघाने १२ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. दरम्यान एक सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांच्या सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्सने २१४ धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सने २१२ धावा केल्या आहेत.
मात्र गेल्या ५ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर मुंबईचा संघ आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. या संघाने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर वानखेडे स्टेडियमवरील रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ ८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबईने ५ सामने जिंकले आहेत. (Cricket news in marathi)
कशी असेल खेळपट्टी? ( MI vs RR Pitch Report)
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. या खेळपट्टीवर अनेकदा २०० पेक्षा अधिक धावा केल्या गेल्या आहेत आणि २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला गेला आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठीही तितकीच फायदेशीर आहे. मात्र बाऊंड्रीलाईन छोटी असल्याने फलंदाजांची लॉटरी लागते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.