IPL 2024 latest points table standings after csk vs srh match amd2000 twitter
Sports

IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

IPL Points Table Update After CSK vs SRH Match: चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पाहा कोणता संघ कितव्या स्थानी आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना चेन्नईने विजयी घोडदौड सुरु ठेवत सनरायझर्स हैदराबाद संघाला पाचव्यांदा पराभूत केलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २१३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला अवघ्या १३४ धावा करता आल्या. दरम्यान या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ७८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

चेन्नईची मोठी झेप...

या सामन्यातील विजयाचा चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा फायदा झाला आहे. हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानाहून थेट तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर या सामन्यापूर्वी तिसऱ्या स्थानी असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी सरकला आहे. सध्या गुणतालिकेत १० गुण असलेले ५ संघ आहेत. ज्यात चेन्नई सुपर किंग्जसह, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा समावेश आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोणता संघ आघाडीवर?

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने ९८ धावांची खेळी केली. या खेळीनंतर ऑरेंज कॅपची लढत आणखी रोमांचक झाली आहे. विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. तर ऋतुराज गायकवाड आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ५०० धावा केल्या आहेत. तर ऋतुराज गायकवाडने ९ सामन्यांमध्ये ४४७ धावा केल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आघाडीवर?

चेन्नईच्या २ खेळाडूंनी पर्पल कॅपच्या यादीत प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने ९ सामन्यांमध्ये १४ गडी बाद केले आहेत. तर मुस्तफिजुर रहमानने ८ सामन्यांमध्ये १४ गडी बाद केले आहेत. तर हर्षल पटेलच्या नावे ९ सामन्यांमध्ये १४ गडी बाद करण्याची नोंद आहे. टॉप ३ मध्ये असलेल्या गोलंदाजांनी प्रत्येकी १४-१४ गडी बाद केले आहेत. त्यामुळे ही लढत आणखी रोमांचक होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT