Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

CSK vs SRH,IPL 2024: चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना काय म्हणाला पॅट कमिन्स? जाणून घ्या.
Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...
Pat cummins statement after defeat against chennai super kings in csk vs srh match amd2000twitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर २१२ धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाचा डाव अवघ्या १३४ धावांवर आटोपला. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स निराश असल्याचं दिसून आलं आहे.

सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, ' आम्हाला वाटलं होतं की, धावांचा पाठलाग करताना आम्हाला जिंकण्याची संधी मिळेल. मात्र असं होऊ शकलं नाही. विरोधी संघातील गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी उत्तम होती. त्यामुळेच आमच्याकडे सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. मात्र आम्ही ही संधी गमावली. आम्हाला सलग २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आम्ही नक्कीच कमबॅक करू.'

Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...
CSK vs SRH,IPL 2024: हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

सनरायझर्स हैदराबाद चेन्नईविरुद्ध चेन्नईमध्ये आपला पाचवा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या पाचही सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, ५ संघांनी १० गुणांची कमाई केली आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्जचा नेट रनरेट चांगला असल्याने हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. इथून पुढे प्लेऑफची शर्यत आणखी रोमांचक होणार आहे.

Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...
Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने २१२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला अवघ्या १३४ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com