CSK vs SRH,IPL 2024: हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

CSK vs SRH Playing XI Prediction: आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.
हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
CSK vs SRH playing XI Prediction chennai super kings vs sunrisers hyderabad playing 11 news in marathi amd2000twitter
Published On

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता चेन्नई सुपर किग्ंज संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदाराबाद संघाविरुद्ध होणार आहे. ऋतुराज गायकवाडने या स्पर्धेला चांगली सुरुवात केली होती.

मात्र या संघाला लखनऊ सुपरजायंट्स संघाकड सलग २ सामने गमवावे लागले आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सर्वच संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

सनरायझर्स हैदराबाद संघाबद्दल बोलायचं झालं तर, ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा संघाला आक्रमक सुरुवात करुन देत आहेत. फलंदाजीला येऊन ही जोडी संघाला आक्रमक सुरुवात करुन देऊ शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्धची कामगिरी सोडली, या संघाने प्रत्येक संघाविरुद्ध खेळताना चांगली सुरुवात केली आहे. चेन्नईला हा सामना जिंकायचा असेल, तर या जोडीला लवकरात लवकर बाद करणं गरजेचं असणार आहे.

हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
DC vs MI, IPL 2024: टीम डेव्हिडच्या षटकाराने फॅन गंभीर दुखापत; Video तुफान व्हायरल

सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी दमदार असली, तर गोलंदाजीत या संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. हा सामना चेन्नईमध्ये होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघ ४ वेळेस आमने सामने आले आहेत. या चारही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारली आहे. तसेच दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ २० वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाने १४ सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैजराबाद संघाला ६ सामने जिंकता आले आहेत.

हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

सनरायजर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, एडेन मार्करम, नीतीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिंस, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, जयदेव उनादकट

इम्पॅक्ट प्लेअर- टी नटराजन

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, मोइन अली, एमएस धोनी, दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पथिराना

इम्पॅक्ट प्लेअर- शार्दुल ठाकुर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com