RCB vs SRH: पाटीदार-कोहलीची शानदार खेळी; हैदराबादसमोर २०७ धावांचं आव्हान

IPL 2024 RCB vs SRH: आयपीएल २०२४ च्या ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आमनेसामने आलेत.
IPL 2024 RCB vs SRH
IPL 2024 RCB vs SRHX IPl

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru :

आयपीएल २०२४ च्या ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आमनेसामने आलेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. नाणेफेक जिंकून आरसीबीने फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि पाटीदारच्या शानदार खेळी करत २०६ धावा केल्या.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा योग्य ठरवत आरसीबीच्या फलंदाजांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केलं. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकीय खेळी केली. या दोन अर्धशतकांच्या जोरावर आरसीबी संघाने २०६ धावा केल्या. विराट कोहली ५१ धावा आणि रजत पाटीदार ५० धावा केल्या. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने आरसीबीच्या तीन फलंदाजांना बाद केले.

SRH प्लेइंग-११

अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

RCB चे प्लेइंग-११

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.

IPL 2024 RCB vs SRH
T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सेहवागने निवडली प्लेइंग ११ ; IPL मधील ५ संघांच्या कर्णधारांना स्थान नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com