DC vs MI, IPL 2024: टीम डेव्हिडच्या षटकाराने फॅन गंभीर दुखापत; Video तुफान व्हायरल

Tim David Viral Video: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात एक वाईट घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे.
Fan got injured due to tim david six during dc vs mi match video viral amd2000
Fan got injured due to tim david six during dc vs mi match video viral amd2000twitter

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात एक वाईट घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई इंडियन्स संघातील आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडने षटकार मारला, हा चेंडू स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या फॅनला जाऊन लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी सुरु असताना १४ व्या षटकात ही घटना घडली. हे षटक टाकण्यासाठी खलील अहमद गोलंदाजीला आला होता. त्यावेळी टीम डेव्हिड फलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर टिम डेव्हिडने गगनचुंबी षटकार मारला. हा षटकार त्याने काऊ कॉर्नरच्या दिशेने मारला. सामना पाहण्यासाठी आलेल्या एका फॅनने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तो दुखापतग्रस्त झाला.

Fan got injured due to tim david six during dc vs mi match video viral amd2000
IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

हा चेंडू त्याला इतका जोरात लागला की, चेंडू लागताच रक्त आलं. त्याने रुमाल काढला आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड त्याला उपचार करण्यासाठी बाहेर घेऊन जातात. हा चेंडू इतका जोरात लागला होता की, तो फॅन वेदनेने विवळत होता. या सामन्यात टीम डेव्हिडने १७ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र त्याची ही खेळी मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. हा सामना मुंबई इंडियन्स संघाला १० धावांनी गमवावा लागला आहे.

Fan got injured due to tim david six during dc vs mi match video viral amd2000
Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

मुंबईचा पराभव...

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जॅक फ्रेजर मॅक्गर्कने अवघ्या २७ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकअखेर ४ गडी बाद २५७ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून तिलक वर्माने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुंबई इंडियन्स संघाला हा सामना १० धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com