इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत शनिवारी (२३ मार्च) डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्लीवर शानदार विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघावर शानदार विजय मिळवला. दोन्ही संघांना विजयाची समान संधी असताना शेवटच्या चेंडूवर निकाल कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या बाजूने लागला.दरम्यान या सामन्यानंतर काय म्हणाला सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार? जाणून घ्या.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, ' आम्ही विजयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, मात्र विजय आमच्या नशिबात नव्हता. आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचा मला आनंद आहे. आंद्रे रसेलने तेच केलं ज्यासाठी तो ओळखला जातो. त्याला थांबवणं खूप कठीण होऊन जातं. एकंदरीत जर आम्ही पाहिलं तर आम्ही चांगला खेळ केला. तुम्ही चांगली रणनीती बनवून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करता. मात्र शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणं खूप कठीण होऊन जातं.'
तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्हाला हेनरिक क्लासेन आणि शाहबाझ अहमदने शानदार कमबॅक करून दिलं. कोणी विचार केला होता आम्ही आव्हानाच्या इतक्या जवळ पोहचू. दुर्दैवाने आम्ही विजय मिळवू शकलो नाही. मात्र आम्ही बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना त्यांच्याच होम ग्राउंडवर चांगला खेळ केला. ' (Cricket news in marathi)
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी २०९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली मात्र मधल्या षटकांमध्ये लय कायम ठेवता आली नाही. दरम्यान शेवटच्या षटकांमध्ये क्लासेनच्या फटकेबाजीने हैदराबादचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला मात्र विजय संपादन करू शकला नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.