CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Chennai Super Kings Vs SunRisers Hyderabad/IPL 2024 : ऋतराज गायकवाडच्या तुफानी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किग्जला २१२ धावांपर्यंत मजल मारता आला. ऋतराज गायकवाडने ५४ चेंडून ९८ धावा केल्या. त्याचं शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं.
CSK Vs SRH
CSK Vs SRH Saam Digital

ऋतराज गायकवाडच्या तुफानी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किग्जला २०१२ धावांपर्यंत मजल मारता आला. ऋतराज गायकवाडने ५४ चेंडून ९८ धावा केल्या. त्याचं शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. सरनरायझर्स हैदराबादसमोर २१३ धावांच लक्ष्य ठेवलं आहे. ऋतुराज आणि डॅरिल मिशेल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची शतकी भागीदारी केली.

चेन्नईचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र सुरुवात खराब झाली होती. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर ऋतुराज आणि डॅरिल मिशेल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची शतकी भागीदारी करत डाव सावरला. या दरम्याने गायकवाडने या हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले, ९८ धावांवर असताना तो शतक झळकवेल असं वाटत होतं, मात्र अवघ्या दोन धावांनी त्याचं शतक हुकलं, तर डॅरिलही आपलं अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला.

CSK Vs SRH
RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

त्यानंतर जयदेव उनाडकटने डॅरिल मिशेलला बाद केलं आणि ही शतकी भागीदारी संपुष्टात आणली. मिचेलने ३२ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. यानंतर शिवम दुबेने गायकवाड यांना चांगली साथ दिली. गायकवाडने दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळी सुरू ठेवली आणि सलग दुसरे शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचला. मात्र, टी. नटराजनने गायकवाडला शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद करून शतकापासून रोखलं. गायकवाडने ५४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार मारले. 

CSK Vs SRH
GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com