विल जॅक्स आणि विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने गुजरात टायटन्सवर ९ गडी आणि ४ ओव्हर राखून विजय मिळवला. विल जॅक्सने ४१ चेंडून शतक झळकावलं तर विराट कोहलीने ७४ धावा केल्या. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने दिलेलं २०० धावांच लक्ष्य बेंगळुरूने १६ व्या षटकातचं गाठलं. आयपीएल २०२४ च्या सत्रातील हा एक मोठा विजय आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या. त्यासाठी साई सुदर्शन (84) आणि शाहरुख खान (58) यांनी उत्कृष्ट खेळी केली. प्रत्युत्तरात विल जॅकच्या (100) स्फोटक शतकाच्या जोरावर बेंगळुरूने अवघ्या 41 चेंडूत 16 षटकांत हे लक्ष्य गाठले. जॅकशिवाय विराट कोहलीनेही झटपट 70 धावा केल्या. बेंगळुरूचा हा सलग दुसरा आणि स्पर्धेतील तिसरा विजय आहे. आरसीबी संघाने १६ षटकांत १ गडी गमावून २०६ धावा केल्या. अवघी एक विकेट गमावत आरसीबीने मिळवलेल्या या विजयानंतर गुणतालिकेत २ गुण मिळवले आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संथ खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आजच्या सामन्यात विराटने तुफानी खेळी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. विराट कोहली आणि विल जॅक्सची जोडी शेवटपर्यंत नाबाद राहिली. विराटने ४४ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या जोरावर ७० धावा केल्या. तर विल जॅक्सने ४१ चेंडूत १० षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या.
गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या साई सुदर्शनने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले. तर शाहरुख खानने ५४ धावा चोपल्या.सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शुभमन गिलला १६ तर रिद्धीमान साहाला अवघ्या ५ धावा करत आल्या. यासह या संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २०० धावा करत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी २०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.