IPL 2024 KKR vs SRH Match Highlights Last over thriller in Kolkata knight riders vs Sunriseres Hyderabad Match Cricket news marathi amd2000 twitter
Sports

KKR VS SRH Last Over: २ चेंडूत ५ धावांची गरज अन् एका कॅचमुळे फिरली मॅच! शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

KKR vs SRH, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

KKR vs SRH IPL 2024, Last Over:

आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात निकाल कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या बाजूने लागला. मात्र सनरायझर्स हैदराबादने कडवी झुंज देत कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नाकी नऊ आणले.

एकवेळ असं वाटत होतं की, कोलकाता नाईट रायडर्स हा संघ एकतर्फी विजय मिळवणार. मात्र त्यानंतर हेनरिक कलासेनने विजय खेचून आणला. दरम्यान शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना जिंकला.

या सामन्यातील शेवटच्या षटकात हैदराबाद संघाला विजयासाठी २ चेंडूत ५ धावांची गरज होती. मात्र अर्धशतक खेळी करून फलंदाजी करत असलेला हेनरिक क्लासेन बाद झाल्यानंतर सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या दिशेने फिरला. अटीतटीच्या लढतीत हैदराबादने १९ व्या षटकात १९६ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. या धावा करणं सोपं होतं.मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून हर्षित राणाने शानदार षटक टाकलं आणि संघाला विजय मिळवून दिला. (Cricket news in marathi)

एक कॅचमुळे बदलली मॅच..

हैदराबादला शेवटच्या २ चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज होती. त्यावेळी विस्फोटक फलंदाजी करत असलेला हेनरिक क्लासेन झेलबाद होऊन माघारी परतला. हा चेंडू राणाने स्लो चेंडू टाकला. जर बॅटच्या मध्ये लागला असता तर हा चेंडू बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. मात्र दुर्दैवाने हा चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला.

त्यावेळी थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सुयश शर्माने मागच्या दिशेने धावत भन्नाट झेल टिपला. हा झेल या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. कारण हेनरिक क्लासेन बाद झाला नसता तर हैदराबादने हा सामना सहज जिंकला असता. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजयाचं खातं उघडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT