इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या १७ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून २०८ धावा केल्या. रसेलच्या तुफानी खेळीमुळे कोलकाताने धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात कोलकाता नाइटरायडर्सकडून सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला. (Latest News)
कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात आंद्रे रसेलचा कहर पाहायला मिळाला. रसेलने २५ चेंडूत २५६ च्या स्ट्राईक रेटने ६४ धावांची शानदार खेळी खेळली. यात ३ चौकारांसह ७ उत्कृष्ट षटकारांचा समावेश आहे. या फटेकबाजीमुळे रसेलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. दरम्यान रसेलचे उत्तुंग षटकार पाहून बॉलिवूडचा 'पठाण' शाहरूख खानदेखील खूश झालाय.
आंद्रे रसेलने अनुभवी जलद गती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या चेंडूंवर भरपूर धावा ठोकल्या. भुवनेश्वरने ४ षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये एकही गडी न बाद करता त्याने तब्बल ५१ धावा दिल्या. या सामन्यात रसेलने भुवनेश्वरची जोरदार धुलाई केली. त्याने ९ चौकार आणि ८ षटकार मारलेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वात कमी चेंडूंत ठोकले २०० षटकार
आयपीएलमध्ये रसेल सर्वात कमी चेंडूत २०० षटकार मारणारा फलंदाज झालाय. त्याने १३२२ चेंडूत २०० षटकार ठोकले. याआधी ख्रिस गेलने १८११ चेंडूत २०० षटकार, किरॉन पोलार्डने २०५५ चेंडूत २०० षटकार, एबी डिव्हिलियर्सने २७९० चेंडूत २०० षटकार, महेंद्रसिंग धोनीने ३१२६ षटकार आणि रोहित शर्माने ३७९८ चेंडूत २०० षटकार मारले आहेत. रसेलने आयपीएलमध्ये १९ वेळा ५ किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. या बाबतीत फक्त ख्रिस गेल त्याच्या पुढे आहे. गेलने आयपीएलमध्ये २९ वेळा ५ किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत.
सर्वाधिक षटकार कोणी ठोकले
आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा रसेल हा ९वा फलंदाज ठरलाय. यासाठी त्याने ९७ डाव खेळले. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने १४१ डावात ३५७ षटकार मारलेत. त्यांच्याशिवाय रोहित शर्माने २५७, एबी डिव्हिलियर्सने २५१, महेंद्रसिंग धोनीने २३९ ,, विराट कोहलीने २३५, डेव्हिड वॉर्नरने २२८, केरॉन पोलार्डने 223 आणि सुरेश रैनाने आयपीएलमध्ये 203 षटकार ठोकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.