पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह एकटाच नडला. बुमराहने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात अवघ्या २१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. यासह संघाला चांगली सुरुवातही करून दिली. यासह त्याने पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठलं आहे. याबाबतीत त्याने युजवेंद्र चहलला मागे सोडलं आहे. जसप्रीत बुमराहच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण १३ गडी बाद केले आहेत. तर दुसरीकडे चहलच्या नावे १२ गडी बाद करण्याची नोंद आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र काही गोलंदाज आहेत ज्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचं झालं तर त्याने ७ सामन्यांमध्ये १२.८५ च्या सरासरीने १३ गडी बाद केले आहेत. तर युजवेंद्र चहलने ७ सामन्यांमध्ये १८.८ च्या सरासरीने १२ गडी बाद केले आहेत. या मुंबईचा गोलंदाज जेराल्ड कोएत्जी तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये २१.९२ च्या सरासरीने १२ गडी बाद केले आहेत.
या यादीत पंजाबचा वेगवान गोलंदाज सॅम करन, कगिसो रबाडा, चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आणि हर्षल पटेल या गोलंदाजांचा देखील समावेश आहे.
तर ऑरेंज कॅपच्या यादीबद्दल बोलायचं झालं तर, विराट कोहली हा अव्वल स्थानी विराजमान आहे. विराट कोहलीने या हंगामातील ७ सामन्यांमध्ये खेळताना ७२.२० च्या सरासरीने ३६१ धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाज रियान पराग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये ६३.६० च्या सरासरीने ३१८ धावा केल्या आहेत.
याय यादीत मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ४९.५० च्या सरासरीने २९७ धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाज सुनील नरेन या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी केली. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ६ सामन्यांमध्ये ४६ च्या सरासरीने २७६ धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये ५५.२० च्या सरासरीने २७६ धावा केल्या आहेत .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.