KKR vs RR, IPL 2024: राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर KKR ला मोठा धक्का! श्रेयस अय्यरवर IPL ची मोठी कारवाई

Shreyas Iyer Fined By IPL: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Shreyas iyer fined by ipl for breachnig ipl code of conduct slow over rate during kkr vs rr match
Shreyas iyer fined by ipl for breachnig ipl code of conduct slow over rate during kkr vs rr matchtwitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २२३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना जोस बटलरने वादळी शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या शतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना २ गडी राखून गमावला आहे. दरम्यान या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरवर आयपीएलकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ २२३ धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरला होता. दरम्यान या संघाला निर्धारीत वेळेत २० षटक टाकता आलेले नाही. त्यामुळे आयपीएलच्या नियमांचं उल्लंघंन झालं आहे. दरम्यान निर्धारीत वेळेत षटक पूर्ण न केल्याने आयपीएल आचारसंहितेनुसार, संघाच्या कर्णधारावर १२ लाखांचा दंड आकारला जातो. या सामन्यातही निर्धारीत वेळेत २० षटकं टाकली गेली नाहीत. त्यामुळे श्रेयस अय्यरवर १२ लाखांचां दंड आकारण्यात आला आहे.

Shreyas iyer fined by ipl for breachnig ipl code of conduct slow over rate during kkr vs rr match
Dinesh Karthik Six: दिनेश कार्तिकने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर- Video

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा शेवटच्या चेंडूवर पराभव..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सुनील नरेनने सर्वाधिक १०९ धावांची खेळी केली. त्याने ५६ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने १०९ धावा केल्या. तर अंगक्रिश रघुवंशीने ३० धावा केल्या. या खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद २२३ धावा केल्या.

Shreyas iyer fined by ipl for breachnig ipl code of conduct slow over rate during kkr vs rr match
IPl 2024: हार्दिक पांड्याचं T20WC मध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार? पुढील ८सामन्यात ठरणार भवितव्य

राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना जोस बटलरने ६० चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ६ षटकार मारत १०७ धावांची खेळी केली. तर रियान परागने ३४ आणि रोमेन पॉवेलने २६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने २ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com