paralympics  twitter
क्रीडा

Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये भारताला विक्रमी पदके! कोणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी

Paris Paralympics Medal Winner List: भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करुन दाखवली आहे.

Ankush Dhavre

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धा समाप्त झाली आहे. या स्पर्धेला २८ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती. तर ८ सप्टेंबर हा स्पर्धेतील शेवटचा दिवस होता. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम स्पर्धा ठरली आहे.

कारण या स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. या स्पर्धेसाठी ८४ खेळाडू सिटी ऑफ लव्ह पॅरिसमध्ये दाखल झाले होते. या खेळाडूंनी १२ वेगवेगळ्या खेळांमध्ये आपलं नशीब आजमावलं आणि देशासाठी २९ पदकं जिंकली.

भारतीय खेळाडूंची रेकॉर्डब्रेक कामगिरी

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी रेकॉर्डब्रेक कामगिरी करुन दाखवली आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी १९ पदकं आपल्या नावावर केली होती. ज्यात ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा समावेश होता. मात्र यावेळी हा आकडा २९ वर जाऊन पोहोचला आहे, जे यापूर्वी कधीच झालं नव्हतं. यादरम्यान भारतीय खेळाडूंनी ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांची कमाई केली आहे.

भारतीय खेळाडूंनी रचला इतिहास

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. भारतीय पॅरा भालाफेकपटू सुमीत अंतिलने भालाफेक या क्रीडा प्रकारात आपलं टायटल राखलं. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर त्यानेत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

शितल ठरली सर्वात युवा खेळाडू

आपली पहिलीच पॅरालिम्पिक स्पर्धा खेळत असलेली शितल देवी ही पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. तिने वय १७ वर्ष ७ महिने आणि २३ दिवस असताना पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलं आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड प्रविण कुमारने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत वय १८ वर्ष ३ महिने आणि १९ दिवसाचा असताना आपल्या नावे केला होता. यासह धरमवीर हे पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे सर्वात वरिष्ठ भारतीय खेळाडू ठरले आहेत. त्यांनी वय ३५ वर्ष आणि ३ महिने इतकं असताना सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारे खेळाडू

नेमबाजी

■ अवनी लेखरा - सुवर्णपदक ■ मोना अगरवाल

कांस्यपदक

■ मनीष नरवाल - रौप्यपदक

■ रुबिना फ्रान्सिस कांस्यपदक

अॅथलेटिक्स

* प्रवीण कुमार - सुवर्णपदक

* नवदीप सिंग -

सुवर्णपदक

* सुमित अंतील - सुवर्णपदक

• धरमबीर - सुवर्णपदक

* प्रणव सुरमा - रौप्यपदक

■ निशाद कुमार - रौप्यपदक

■ शरद कुमार - रौप्यपदक

* सचिन खिलारी- रौप्यपदक

• योगेश कथुनिया - रौप्यपदक

■ अजित सिंग - रौप्यपदक

■ मरियप्पन थंगावेलू - कांस्यपदक

* होकाटा होतोझे सेमा - कांस्यपदक

* सुंदरसिंग गुर्जर - कांस्यपदक

प्रीती पाल- कांस्यपदक

प्रीती पाल -कांस्यपदक

सिमरन - कांस्यपदक

■ दीप्ती जिवानजी- कांस्यपदक

■ नितेश कुमार -सुवर्णपदक

■ सुहास यधिराज - रौप्यपदक

■ मरुगेसन खुलासिमाथी - रौप्यपदक

■ मनीषा रामदास कांस्यपदक

■ नित्य श्री सुमती सिवन -कांस्यपदक

तिरंदाजी

* हरविंदर सिंग - सुवर्णपदक

■ शीतल देवी आणि राकेश कुमार - कांस्यपदक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

SCROLL FOR NEXT