mohammed shami saam tv news
क्रीडा

Narendra Modi Tweet: वेल प्लेड...!शमीच्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल; ट्वीट करत म्हणाले..

Narendra Modi On Mohammed Shami: मोहम्मद शमीने दमदार खेळ केल्यानंतर नरेंद्र मोदींनी ट्वीट करत त्याचं कौतुक केलं आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami:

भारतीय संघाने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फलंदाजीत विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलने दमदार खेळ केल्यानंतर गोलंदाजीत मोहम्मद शमीचा जलवा पाहायला मिळाला आहे.

त्याने या सामन्यात भेदक मारा करत ७ गडी बाद केले. दरम्यान या कामगिरीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, ' आजचा सेमीफायनलचा सामना वैयक्तिक कामगिरीमुळे आणखी खास बनला आहे. येणारी पिढीही मोहम्मद शमीची ही कामगिरी विसरु शकणार नाही..वेल प्लेड शमी..!'

वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद शमीचा जलवा..

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद शमीचा जलवा पाहायला मिळाला आहे. त्याने या स्पर्धेत गोलंदाजी करताना सर्वाधिक २३ गडी बाद केले आहेत. मुख्य बाब म्हणजे त्याने हा कारनामा केवळ ६ सामन्यांमध्ये करुन दाखवला आहे. न्यूझीलंडविरुजद्ध केलेल्या या कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावांची खेळी केली.

तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली.डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शुभमन गिलने ८० धावांची खेळी केली. ५० षटकअखेर भारतीय संघाने ४ गडी बाद ३९७ धावांचा डोंगर उभारला. (Latest sports updates)

या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ३२७ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून डॅरील मिचेलने १३३ धावांची तुफानी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ गेली आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ७ गडी बाद केले.त्याने ९.५ षटकात ५७ धावा खर्च करत ७ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT