विश्वचषक 2023 सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर तब्बल ७० धावांनी विजय मिळवला. मोहमद शमी हा टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. कारण या सामन्यात शमीने एक दोन नव्हे, तर तब्बल ७ विकेट्स मिळवल्या. त्याच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. दरम्यान, सामन्यानंतर मोहमद शमीने ऐतिहासिक विजयाचे रहस्य सांगितले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी मोहमद शमी म्हणाला, "जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या वर्ल्डकपमध्ये खेळत असता, तेव्हा आपल्या सर्वांना अशी संधी पुन्हा कधी मिळेल माहीत नसते. त्यामुळं मला मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला".
"आम्ही २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषक सेमीफायनलमध्ये हरलो होतो. त्यामुळे आता मिळालेली संधी आम्हाला गमावायची नव्हती. यावेळी सर्व काही सर्वस्व पणाला आम्ही लावले होते. न्यूझीलंडची फलंदाजी चांगली होत होती, तरी देखील आम्ही शेवटपर्यंत सामना सोडायचा नाही, हे ठरवलं होतं", असंही शमी म्हणाला.
न्यूझीलंडविरोधात काय स्ट्रॅटेजी वापरली असा, प्रश्न शमीला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शमी म्हणाला, वानखेडे मैदान फलंदाजीसाठी चांगलं होतं. मात्र, चेंडू पुढे टाकून वळवण्याचा आमचा प्रयत्न होता. याशिवाय माझ्या मनात होतं की आपण यॉर्कर्स आणि स्लोअर बॉल यावर भर द्यायला पाहिजे. त्याचबरोबर मी नवीन चेंडूवर विकेट घेऊन न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलण्याचा आमचा प्लान होता, असं शमीने सांगितलं.
माझ्याकडून केनचा झेल सुटला याचं मला वाईट वाटलं होतं, पण मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं. खेळपट्टीवरील गवत छान कापलेलं होतं, आम्ही केलेल्या धावा पुरेशा होत्या, असंही शमीने सांगितलं. दरम्यान, मोहमद शमीने या सामन्यात अत्यंत हुशारीनं गोलंदाजी केली. त्याने ५७ धाव देत ७ बळी घेत न्यूझीलंडच्या संघाचं कंबरडंच मोडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.