india would have to participate in icc champions trophy in pakistan rashid latif given warning amd2000 google
Sports

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Rashid Latif On ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे. तब्बल २८ वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानला पहिल्यांदाच कुठल्याही आयसीसी स्पर्धेचे यदमानपद भुषवण्याची संधी देण्यात आली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे. तब्बल २८ वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानला पहिल्यांदाच कुठल्याही आयसीसी स्पर्धेचे यदमानपद भुषवण्याची संधी देण्यात आली आहे. यापूर्वी १९९६ वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. ही स्पर्धा भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या भरवण्यात आली होती. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेला आयसीसीच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली. मात्र पाकिस्तानात पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले गेले होते. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते. यावेळीही भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. याबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ म्हणाला की, ' चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकणं मुळीच सोपं नसेल. तुम्ही द्विपक्षीय मालिका खेळण्याचा प्रस्ताव धुडकावून लावू शकता. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये असं करणं कठीण आहे. आयसीसीने एकदा आराखडा तयार केला की, तुम्हाला माहित असतं तुम्हाला कुठे खेळायचं आहे. बाबर आझमलाही वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जावं लागलं होतं.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आयसीसीच्या स्पर्धांसाठी सर्व संघ संमतीनंतर स्वाक्षरी करतात. मग तुम्ही नकार कसा देऊ शकता? दोन्ही देशांच्या सरकारी स्तरावर काही असतं तर तुम्ही अशी उत्तरं देऊ शकले असता. पण सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानात खेळण्यासाठी येणार नसाल. तर माझ्या मते भारतीय संघाने पाकिस्तानात येण्याचा प्रस्ताव फेटाळला तर याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zomato Swiggy Strike : कल्याणमध्ये झोमॅटो आणि स्विगी ५०० कर्मचारी संपावर, नेमकं काय प्रकरण ?

Mumbai Local: मध्य रेल्वे खोळंबली! बदलापुरजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवासी रूळावरून चालत निघाले; पाहा VIDEO

Kitchen Hacks : वर्षभर धान्य राहील फ्रेश; आताच करा 'हा' रामबाण उपाय, अळ्या-किड होणार नाहीत

Durgadi Fort History: कल्याणमध्ये वसलेला दुर्गाडी किल्ला! ऐतिहासिक वारसा आणि भव्य वास्तुकलेची ओळख, जाणून घ्या इतिहास

कच्चा लसूण चावून खाल्ल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT