ICC Test Ranking: टी -२० वर्ल्डकपआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाने मागे सोडत गाठलं नंबर १ स्थान

Latest ICC Test Rankings: आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाला मागे सोडत ऑस्ट्रेलियाने टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी कब्जा केला आहे.
Australia claims number 1 spot in icc test ranking team India reclaim t20i and odi number 1 spot amd2000
Australia claims number 1 spot in icc test ranking team India reclaim t20i and odi number 1 spot amd2000saam tv news

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाला मागे सोडत ऑस्ट्रेलियाने टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी कब्जा केला आहे. तर वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा जलवा कायम आहे. वनडे आणि टी -२० रँकिंगमध्ये भारतीय संघ नंबर १ स्थानी कायम आहे.

आयसीसीने नुकताच कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. यानुसार, ऑस्ट्रेलियाने १२४ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी धडक दिली आहे. तर १२० रेटिंग पॉइंट्ससह भारतीय संघाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. या यादीत इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडने रेटिंग पॉइंट्स १०५ आहे. १०३ रेटिंग पॉइंट्ससह दक्षिण आफ्रिकेचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. हे ४ संघ सोडले तर उर्वरित सर्व संघांचे रेटिंग पॉईंट्स हे १०० पेक्षा कमी आहेत. भारतीय संघाने २०२०-२१ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ ने धुव्वा उडविला होता.

Australia claims number 1 spot in icc test ranking team India reclaim t20i and odi number 1 spot amd2000
Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

टी -२०, वनडेमध्ये भारताचा संघ अव्वल स्थानी..

कसोटी रँकिंगमध्ये भारताचा संघ दुसऱ्या स्थानी गेला असला तरीदेखील भारतीय फॅन्सला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघ वनडे आणि टी -२० क्रिकेटच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. भारतीय संघाने वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. २०२३ चा वनडे वर्ल्डकप भारतात पार पडला.

Australia claims number 1 spot in icc test ranking team India reclaim t20i and odi number 1 spot amd2000
IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

या स्पर्धेतही भारतीय संघाने शानदार कामगिरी केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सुरुवातीचे १० सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात या संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com