कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून २५ लाखांचा हप्ता? शिवसेना शहरप्रमुखांचा KDMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

KDMC Officials Accused Of Collecting ₹25–30 Lakh: कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी केडीएमसीच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांकडून दररोज २५ ते ३० लाख रुपयांचा हप्ता वसूल केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Hawkers occupy a busy roadside area in Kalyan-Dombivli as political controversy erupts over alleged daily bribe collections from street vendors.
Hawkers occupy a busy roadside area in Kalyan-Dombivli as political controversy erupts over alleged daily bribe collections from street vendors.Saam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांकडूनही फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी या प्रकरणात केडीएमसीच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Hawkers occupy a busy roadside area in Kalyan-Dombivli as political controversy erupts over alleged daily bribe collections from street vendors.
Pune Crime : पुण्यातील तरुणाच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; मैत्रिणीनं नेमका काय मेसेज केला होता?

फेरीवाल्यांकडून दररोज मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल केला जात असून त्यातून अधिकारी आणि कर्मचारी लाखो रुपयांची माया जमवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रवी पाटील यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील विविध प्रभागांमध्ये फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल केला जातो. एका प्रभागातून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत हप्ता गोळा केला जातो, तर संपूर्ण शहरातून दिवसाला तब्बल २५ ते ३० लाख रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हप्त्यांतून कोट्यवधी रुपयांची मलई अधिकारी आणि कर्मचारी खात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Hawkers occupy a busy roadside area in Kalyan-Dombivli as political controversy erupts over alleged daily bribe collections from street vendors.
Pune Crime: इफ्तार पार्टीदरम्यान रक्तरंजित थरार, तरुणांवर कोयत्याने सपासप वार; ५ जण गंभीर जखमी, पुण्यात खळबळ

दरम्यान, शहरातील अनेक फेरीवाले हे स्थानिक नसून बाहेरून आलेले असल्याचा दावा करत केडीएमसीकडे स्पष्ट फेरीवाला धोरण नसल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे त्यांनी सांगितले. फेरीवाल्यांमुळे रस्ते आणि फुटपाथ व्यापले जात असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार त्यांनी केली.यापूर्वीही शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक गजानन पाटील आणि काही नगरसेविकांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती.

Hawkers occupy a busy roadside area in Kalyan-Dombivli as political controversy erupts over alleged daily bribe collections from street vendors.
Pune : लग्नाच्या तीन महिन्यानंतर महिलेने संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण

तसेच भाजपच्या नगरसेविका रंजना पेणकर यांनीही डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर १६ मार्च रोजी होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत फेरीवाल्यांचा मुद्दा चर्चेसाठी मांडण्यात येणार असून या विषयावर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय नगरसेवक या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असल्याने महासभेत आयुक्त काय उत्तर देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, फेरीवाल्यांविरोधात तातडीने कारवाई न केल्यास शिवसेना मोठे आंदोलन उभारेल असा इशाराही शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या महासभेत या विषयावर नेमकी काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com