भारत-पाक सामन्याला प्रेक्षकांचा उत्साह कमी आहे.
जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर वातावरण गंभीर आहे.
शोएब अख्तर म्हणाला, भारताचा विजय होईल.
रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज एशिया कपचा सामना होणार आहे. मात्र यामध्ये नेहमीसारखा उत्साह आणि वातावरण या वेळी मात्र दिसून येत नाहीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मात्र यंदाच्या वेळी हाय व्होल्टेज सामन्यांना भारतीय नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येतंय.
गेल्या काही महिन्यांत सीमारेषेवरील तणाव वाढला आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ मृत्युमुखी पडल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेपेक्षा उदासीनता जास्त जाणवतेय.
अशातच आज होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा विजय होणार असल्याचं म्हटलं आहे. एका पाकिस्तानी कार्यक्रमात बोलताना अख्तरने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमचं कौतुक केलं. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, हा भारतीय टीम आजवरच्या सर्वात प्रभावी T20 टीमपैकी एक आहे.
अख्तर म्हणाला, “हे स्पष्ट आहे की, भारत पाकिस्तानचं कंबरडं नक्की मोडणार आणि दबावाखाली ठेवणार. पाकिस्तानवर भारताचं वर्चस्व असेल यात शंका नाही. खरं सांगायचं तर त्यांना अंतिम फेरीत पाकिस्तानऐवजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळायला आवडेल.”
माजी पाकिस्तानी कर्णधार मिसबह-उल-हकने मात्र वेगळा मुद्दा मांडला. त्याने सांगितले की, या भारतीय टीमकडे विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू नाही. जर भारताने सुरुवातीला दोन विकेट गमावल्या तर त्यांच्याकडे विराट नाही जो डाव सावरून नेतो. नवे खेळाडू अजून या गोलंदाजांविरुद्ध जास्त खेळलेले नाहीत. अशावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांना संधी मिळू शकते.
मिसबहच्या या विधानावर अख्तरने थेट प्रत्युत्तर दिलं. त्याने भारतीय मिडल ऑर्डरची ताकद सांगत म्हटलं की, मला माफ कर पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, भारताकडे रिंकू सिंह, संजू सॅमसन, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि जितेश शर्मा आहेत. इतकेच नव्हे तर अगदी अक्षर पटेलसुद्धा फलंदाजी करू शकतो. याशिवाय अभिषेक शर्माही आहे. ही टीम पूर्वीची टीम नाहीये जी दोन विकेट्स गेल्या म्हणून हा गडगडेल.”
अख्तरच्या मते, भारताकडे आजवरच्या इतिहासातील सर्वात मजबूत मधल्या फळीतला फलंदाजी क्रम आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारतावर वरचढ ठरणे कठीणच जाणार आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध मागील पाचही सामन्यांत विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा भारताविरुद्धचा शेवटचा विजय २०२२ च्या एशिया कपमध्ये ‘सुपर ४’ फेरीत आला होता. त्यानंतर भारताने सतत वर्चस्व राखलं आहे.
भारत-पाक सामन्यात प्रेक्षकांचा उत्साह का कमी आहे?
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे उत्साह कमी झाला आहे.
शोएब अख्तरने भारताच्या कोणत्या गोष्टीचे कौतुक केले?
भारतीय टीमच्या मजबूत मधल्या फळीचे कौतुक केले.
मिसबह-उल-हकने भारतीय टीमच्या कोणत्या कमतरतेवर भर दिला?
विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीवर भर दिला.
शोएब अख्तरच्या मते भारताचा सर्वात मोठा फायदा कोणता?
मजबूत मधला फळीचा फलंदाजी क्रम हा मोठा फायदा आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्धचे अखेरचे किती सामने जिंकले आहेत?
भारताने मागील पाचही सामने पाकिस्तानविरुद्ध जिंकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.