
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप-२०२५ ची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात भारताने यूएईचा नऊ विकेट्सने पराभव केला. आता पुढच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. हा सामना रविवार, १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत-पाकिस्तान दोन्ही संघांनी आपला पहिला सामना खेळला आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला तर पाकिस्तानने ओमानचा पराभव केला. भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या रूपात फक्त एकच वेगवान गोलंदाज घेऊन यूएईविरुद्ध खेळला होता, त्यामुळे अर्शदीप सिंग पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विरु्दध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११ जाणून घ्या.
टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अर्शदीपला संघात स्थान मिळणार का?
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ३१ जानेवारी २०२५ रोजी, म्हणजेच २२३ दिवसांपूर्वी खेळला होता. त्यानंतर भारतीय संघाने मुंबईत आणखी एक सामना खेळला. त्यानंतर संघ आशिया कपसाठी यूएईला रवाना झाला.अर्शदीप सिंग हा भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने ६३ सामन्यांमध्ये एकूण ९९ विकेट घेतल्या आहेत आणि टी-२० मध्ये १०० विकेट घेण्यापासून तो फक्त एक विकेट दूर आहे. दमदार कामगिरी करुनही आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अर्शदिपला स्थान मिळाले नाही त्याऐवजी फिरकीपटू वरुण चक्रवतीला संघात सामील करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तरी या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला स्थान मिळणार का, असा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो.
कोणाला मिळणार भारत विरुद्ध पाकिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान?
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या जोडीने युएईविरुद्धच्या सामन्यात ८ बॅटर थ्योरीनुसार, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती हे तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते. कुलदीप यादवने फक्त ७ धावा देत ४ विकेट्स घेत दमदार कामगिरी केली त्यामुळे त्याला संघाबाहेर बसवण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. तर अर्शदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी अक्षर पटेल किंवा वरुण चक्रवर्ती यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागेल. अक्षर पटेल गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, अशातच वरुण चक्रवतीला संघातून वगळण्याची शक्यता जास्त आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती / अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.