IND vs PAK WCL 2025: नाही म्हणजे नाहीच! हरभजन, शिखर धवनचा मोठा निर्णय; अखेर भारत-पाकिस्तान सामना रद्द

World Championship Of Legends 2025: क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स या लीगमध्ये नियोजित असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना अखेर रद्द करण्यात आला आहे.
World Championship Of Legends 2025
World Championship Of Legends 2025saam tv
Published On
Summary
  • 20 जुलैला होणारा भारत-पाकिस्तान सामना WCL 2025 मधून रद्द करण्यात आला.

  • हरभजन सिंग, शिखर धवन, सुरेश रैना आणि युसुफ पठाण यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला.

  • हा सामना ऑपरेशन सिंदूरनंतर पहिला सामना असणार होता, ज्यामुळे वादही निर्माण झाला.

२० जुलै रोजी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ (WCL) स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान आमने-सामने येणार होते. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान लिजेंड्स यांच्यातील हा सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामागे काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास दिलेला स्पष्ट नकार दिला असल्याचं समोर आलं आहे.

प्रमुख भारतीय खेळाडूंनी घेतली माघार

या सामन्याबाबत निर्माण झालेले वाद आणि जनतेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भारताचे काही माजी नामांकित खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. यात भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग, माजी ओपनर शिखर धवन, फलंदाज सुरेश रैना आणि ऑलराऊंडर युसुफ पठाण यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडत भूमिका कळवल्या आहे.

World Championship Of Legends 2025
Retirement : २०२६ टी-२० वर्ल्डकपपूर्वी संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलाच सामना ठरणार होता

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानच्या टीममध्ये होणारा हा पहिलाच क्रिकेट सामना ठरणार होता. पण या विरोधात प्रेक्षक आणि चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध दिसून येत होता. सोशल मीडियावरही पाकिस्तानसोबतचा सामना रद्द करावा, अशी मागणी जोर धरत होती. याची दखल घेत अखेर खेळाडूंनीही आपलं मत मांडलं आणि आयोजकांवर सामनाच रद्द करण्यासाठी दबाव वाढला.

WCL चा अधिकृत खुलासा

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं की, "आम्ही कायमच क्रिकेटला एक सणासारखं मानतो आणि प्रेक्षकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. यंदा पाकिस्तानची हॉकी टीम भारतात आलेली आणि दोन्ही देशांमध्ये व्हॉलीबॉल सामना झाला होता. त्यावरून आम्ही भारत-पाकिस्तान लिजेंड्स सामना घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यात आम्ही अनेकांच्या भावना दुखावल्या, हे आमचं दुर्भाग्य आहे."

World Championship Of Legends 2025
Ind Vs Eng : मँचेस्टर कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त

"आम्ही अनवधानाने भारताचे सन्माननीय माजी खेळाडू ज्यांनी देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केलीये त्यांनाही दुखावलं आहे. आमच्या सोबत असलेल्या ब्रँड्सनाही या प्रकरणामुळे अडचणीत आणलं. म्हणून आम्ही भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलंय.

World Championship Of Legends 2025
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचे कसोटी क्रिकेट खेळणे, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे? पाहा धक्कादायक आकडे
Q

WCL 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना का रद्द करण्यात आला?

A

माजी खेळाडूंचा विरोध आणि चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सामना रद्द करण्यात आला.

Q

कोणते खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास तयार नव्हते?

A

हरभजन सिंग, शिखर धवन, सुरेश रैना आणि युसुफ पठाण.

Q

ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?

A

भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेली सैन्य कारवाई.

Q

सामना रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला?

A

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) आयोजकांनी

Q

सामना रद्द करताना WCL ने काय म्हटले?

A

भावना दुखावल्याबद्दल खंत व्यक्त करत निर्णय मागे घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com