
India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. सध्या मालिकेमध्ये भारत १-२ च्या फरकाने पिछाडीवर आहे. मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला मँचेस्टरचा कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे. चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या प्लेईंग ११ मध्ये बदल केला जाईल असे म्हटले जात आहे. सामन्यापूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
भारतीय संघ सामन्यापूर्वी मँचेस्टरमध्ये सराव करत आहेत. सरावसत्रादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला दुखापत झाली आहे. हा भारतासाठी मोठा धक्का मारला जात आहे. जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीमध्ये विश्रांती घेऊ शकतो असे म्हटले जात आहे. आता मालिकेमध्ये बुमराह फक्त १ सामना खेळणार आहे आणि चौथ्या कसोटीत विश्रांती घेऊन पाचव्या कसोटीत सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.
टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहa चौथी कसोटी खेळेल की नाही हे अद्यापही स्पष्ट नाही. याचा निर्णय सामन्याच्या दिवशी घेतला जाईल. बुमराहला विश्रांती देत असल्यास त्याच्या जागी अर्शदीप सिंहला खेळवले जाईल असे म्हटले जात होते. पण अर्शदीपही दुखापतग्रस्त झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सरावसत्रात चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करत असताना अर्शदीप सिंहच्या बोटाला दुखापत झाली आहे. जखम किती गंभीर आहे हे सध्या सांगणे कठीण आहे. वैद्यकीय पथक अर्शदीपच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. जर त्याच्या बोटाला टाके घालावे लागले, तर ते संघाच्या दृष्टिकोनातून चांगले ठरणार नाही, असे रयान टेन डोशेट यांनी म्हटले आहे.
जसप्रीत बुमराहच्या जागी अर्शदीप सिंहला चौथ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकत होती. पण तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाला प्लेईंग ११ मध्ये जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या २ कसोटी सामन्यात खराब कामगिरीमुळे प्रसिद्ध कृष्णाला तिसऱ्या सामन्यातून वगळण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.