
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताचा अवघ्या २२ धावांनी पराभव झाला. लॉर्ड्स कसोटी सामन्यामध्ये खेळताना भारताचा उपकर्णधार रिषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली होती. असे असतानाही पंतने दोन्ही डावांमध्ये फलंदाजी केली. आता २३ जुलै रोजी सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याशी संबंधित रिपोर्ट समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह मॅनचॅस्टरमध्ये खेळणार आहेत की नाही हे स्पष्ट केले जाणार आहे.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी जसप्रीत बुमराह फक्त ३ कसोटी सामन्यांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. सुरुवातीच्या तीनपैकी लीड्स आणि लॉर्ड्स या दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराह सहभागी झाला होता. सध्या इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचे मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी चौथा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठीच बुमराहला खेळवले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली होती. तरीही त्याने सामन्याच्या दोन्ही डावात फलंदाजी केली. दुखापतीमुळे पंत चौथ्या सामन्यात दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. रिपोर्ट्सनुसार रिषभ पंत देखील मॅचेस्टर येथे चौथ्या कसोटी सामन्यात सहभागी होणार आहे. रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह दोघेही प्लेईंग ११ मध्ये दिसतील असे म्हटले जात आहे.
भारत आणि इंग्लंड हे दोन संघ लीड्समध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. पहिला कसोटी सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला. एजबॅस्टनमध्ये ३३६ धावांनी विजय मिळवत भारताने इतिहास रचला. तिसरा लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यामध्ये भारताला अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडचा संघ २-१ ने मालिकेमध्ये आघाडीवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.