Retirement : २०२६ टी-२० वर्ल्डकपपूर्वी संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

Andre Russell Retirement : २०२६ टी-२० वर्ल्डकप फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत खेळला जाणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्याकडे स्पर्धेचे यजमानपद आहे. टी-२० वर्ल्डकपपूर्वी वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Andre Russell Retirement
Andre Russell Retirement X
Published On

Retirement News : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. जमैकामधील सबिना पार्क येथील स्टेडिमयवर खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांनंतर रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. २०२६ टी-२० विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडियन संघाला मोठा धक्का बसला आहे.

Andre Russell Retirement
Ind Vs Eng 4th Test : चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह- रिषभ पंत खेळणार? टीम इंडियाबाबत मोठी माहिती समोर

३७ वर्षीय आंद्रे रसेल २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये ८४ सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजसाठी त्याने एक कसोटी सामना तर ५६ वनडे सामने खेळले आहेत. पण मागील ६ वर्षांपासून रसेल फक्त टी-२० फॉरमॅटमध्ये त्याच्या संघासाठी सक्रीय होता. जमैकामध्ये २० जुलै रोजी पहिला आणि २२ जुलै रोजी दुसरा सामना खेळला जाईल. त्यानंतर आंद्रे रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

'वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद कामगिरींपैकी एक आहे. मी या ठिकाणी पोहोचेन असे मला कधीच वाटले नव्हते. पण जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात करता आणि खेळाच्या प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही काय साध्य करु शकता हे तुम्हाला समजते. मला वेस्ट इंडिजकडून खेळून माझी छाप पाडायची होती. तसा मी प्रयत्न केला', असे आंद्रे रसेलने म्हटले आहे.

Andre Russell Retirement
Ahmedabad Airplane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत कॅप्टनचीच चूक, अमेरिकन रिपोर्टमध्ये मोठा दावा; काय घडलं?

आंद्रे रसेल म्हणाला, 'मला वेस्ट इंडिजसाठी खेळायला आवडते. मला माझी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट मला उत्तम पद्धतीने करायचा आहे. कॅरेबियन देशांमधून येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूसाठी आदर्श बनायचे आहे'. आंद्रे रसेलने ८४ सामन्यांपैकी ७३ डावांमध्ये एकूण १०७८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २२ आणि स्ट्राइक रेट १६३.०९ आहे. गोलंदाज म्हणून त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये ६१ विकेट्स घेतल्या आहेत.

Andre Russell Retirement
Pune Accidents : पुण्यात अपघातांची साखळी, एकाच ठिकाणी ३ तासांत १० अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com