Pune Accidents : पुण्यात अपघातांची साखळी, एकाच ठिकाणी ३ तासांत १० अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद

Dehu Road Pune Accident News : पुण्यात एकाच जागी फक्त ३ तासांमध्ये १० अपघातांची नोंद झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना रस्त्याच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
Dehu Road Pune Accident News
Dehu Road Pune Accident Newsx
Published On

Pune : पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील देहू-येळवाडी रस्त्यावर अवघ्या ३ तासांत एकाच ठिकाणी १० दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. या रस्त्यावरील खड्डे मातीने भरण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे हा रस्ता निसरडा झाल्याने दुचाकीस्वार अपघाताचे बळी ठरले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Dehu Road Pune Accident News
Pune : पुण्याच्या ससून रुग्णालयात राडा! काचा फोडल्या, मशिन्सची तोडफोड अन् सुरक्षारक्षकाला मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या मावळ तालुक्याच्या देहू-येळवाडी रस्त्याची स्थिती खराब आहे. या रस्त्यावर एका दिवसात तब्बल १० दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे अपघात फक्त ३ तासांमध्ये घडले आहेत. रस्त्याच्या कडेला बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून यात कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे समोर आले आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू-येळवाडी रस्त्यावर अनेक मोठे खड्डे आहेत. सतत तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने तात्पुरत्या दुरुस्तीच्या नावाखाली माती टाकून हे खड्डे नुकतेच भरले. पण पाऊस सुरु होताच माती चिखलात बदलली आणि संपूर्ण रस्ता निसरडा झाला. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

Dehu Road Pune Accident News
Pune Fire : पुण्यात भीषण आग, भंगार दुकान आगीत जळून खाक; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट | VIDEO

प्रशासनाद्वारे करण्यात आलेली ही तात्पुरती दुरुस्तीची सोय अपघातांचे कारण बनत आहेत. खड्डे फक्त मातीने भरणे धोकादायक ठरु शकते असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. याबाबतची सूचना स्थानिकांनी प्रशासनाला दिली होती. पण यात गांभीर्य दाखवण्यात आले नाही. आता अपघातांनंतर रस्त्यावरील खड्ड्यांची स्थिती सुधारावी, जेणेकरुन अपघात घडणार नाहीत, अशी मागणी होत आहे.

Dehu Road Pune Accident News
Ahmedabad Airplane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत कॅप्टनचीच चूक, अमेरिकन रिपोर्टमध्ये मोठा दावा; काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com