
Ind Vs Eng चौथ्या कसोटी सामन्याला २३ जुलै रोजी सुरुवात होणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे हा सामना जसप्रीत बुमराह खेळणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे. १-२ अशा पिछाडीवर भारताचा संघ असल्याने चौथा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. करो या मरो परिस्थिती असल्याने जसप्रीत बुमराह मँचेस्टर कसोटी खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेमध्ये जसप्रीत बुमराह एजबॅस्टन कसोटीत सामील झाला नव्हता. नेमका हा सामना भारताने जिंकला. ज्या सामन्यामध्ये बुमराह सहभागी झाला, ते सामने भारताने गमावले. भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा असलेल्या जसप्रीत बुमराहच्या बाबतीत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीनुसार, जेव्हा कसोटी संघात बुमराहचे नसणे भारतासाठी फायद्याचे ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जसप्रीत बुमराहने ५ जानेवारी २०१८ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून भारतीय संघाने जसप्रीत बुमराहशिवाय २७ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी १९ सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. उरलेले ५ सामने भारताने गमावले, तर ३ सामने अनिर्णित म्हणजेच ड्रॉ झाले. बुमराह प्लेईंग ११ मध्ये नसताना भारताची विजयाची टक्केवारी ७०.४ टक्के इतकी आहे.
दुसऱ्या बाजूला, जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीमध्ये भारतीय संघाने ४७ कसोटी सामने खेळले आहेत. यातील फक्त २० सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला आहे. २२ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उरलेले ४ सामने ड्रॉ झाले आहेत. आकड्याचा विचार केल्यास, जसप्रीत बुमराह संघात सामील असताना भारताची विजयाची टक्केवारी ४२.६ टक्के आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.