rohit sharma adderssed media on virat kohli performance.
rohit sharma adderssed media on virat kohli performance. saam tv
क्रीडा | IPL

IND VS WI : 'तुम्ही शांत राहिल्यास सर्व काही ठीक होईल'; रोहित शर्माने केली विराटची पाठराखण

साम न्यूज नेटवर्क

पश्चिम बंगाल : विराट कोहलीला (Virat Kohli) स्थिती कशी हाताळायची हे चांगलंच माहित आहे. तुम्ही शांत बसलात तर सर्व काही ठीक होईल अशी टिप्पणी माध्यमांवर करीत कर्णधार राेहित शर्माने (Rohit Sharma) आज (मंगळवार) झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत विराट काेहलीची (Virat Kohli) बाजू भक्कमपणे मांडत त्याच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिले. (rohit sharma latest marathi news)

भारत (india) आणि वेस्ट इंडीज (west indies) यांच्यात बुधवारपासून तीन T20 सामने होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत राेहित शर्मा यास विराटच्या कामगिरीबाबत छेडले असता ताे म्हणाला "मला वाटतं, तुम्‍हांपासून (मीडिया) सुरुवात करुया. तुम्‍ही जर काही वेळ शांत बसू शकलात, तर विराट कोहली बरा होईल आणि सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल. तो मानसिक दृष्टया सक्षम आहे. एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (cricket) खेळणा-या प्रत्येक खेळाडूस परिस्थिती हाताळणे माहित असते. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ शांत राहू शकलात तर सर्वकाही ठीक हाेईल असं रोहितने नमूद केले.

दरम्यान सोमवारी, बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरला डाव्या हाताच्या स्नायूंच्या ताणामुळे T20I मालिकेतून वगळले आहे. त्याच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

SCROLL FOR NEXT