Mithali Raj: मितालीने सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, बनली वनडेमधील प्रदीर्घ कारकिर्द असलेली खेळाडू

वनडे क्रिकेटमधील सर्वात प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम आता मिताली राजच्या नावावर आहे.
Mithali Raj
Mithali RajSaam Tv
Published On

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रात मिताली राज (Mithali Raj) या नावाला कुठल्याही दुसऱ्या परिचयाची गरज नाही. पदार्पणाच्या सामन्यात शतक, सर्वात कमी वयात शतक, सर्वाधिक धावा असे अनेक विक्रम करणाऱ्या मिताली राजने आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही एक विक्रम मोडीत काढला आहे.

हा रेकॉर्ड करण्यासाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला 22 वर्षांहून अधिकचा काळ लागला. वनडे क्रिकेटमधील सर्वात प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम आता मिताली राजच्या नावावर आहे.

Mithali Raj
IND VS WI: वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर कुलदीप यादव खेळणार; सुंदर टी-२० मालिकेतून बाहेर

मिताली राज (Mithali Raj) जेव्हा 12 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरली, तेव्हा तिची वनडे (One Day) कारकीर्द 22 वर्षे 231 दिवसांची झाली. त्यासोबतच ती जगातील पहिली अशी व्यक्ती ठरली जिची एकदिवसीय सामन्यांतील कारकीर्द ही 22 वर्षे आणि 100 दिवसांपेक्षा जास्त आहे.

Mithali Raj
IPL 2022: यंदाच्या हंगामात खेळणार नसूनही आर्चरला 8 कोटीत का घेतले?

याआधी पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कारकिर्दीचा (Longest Careers) विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनची वनडे कारकीर्द 22 वर्षे 91 दिवसांची आहे. पण मितालीने आता सचिनला मागे टाकले आहे. आता फक्त सचिनच्या नावावर पुरूष क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम शिल्लक आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com