IND VS WI: वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर कुलदीप यादव खेळणार; सुंदर टी-२० मालिकेतून बाहेर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांना 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथे सुरुवात होणार आहे.
washington sundar IND VS WI
washington sundar IND VS WIsaam tv

सातारा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-२० मालिकेतून भारतीय फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) संघातून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत वॉशिंग्टन सुंदरचे (Washington Sundar) पदार्पण झालं हाेते. परंतु नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळं त्याला पुन्हा विश्रांती देण्यात आली आहे. (Washington Sundar has been ruled out of the Twenty20 series against West Indies)

वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डाव्या हाताच्या स्नायूचा ताण आला होता. त्यामुळं त्याला विश्रांतीची गरज असल्याने त्याच्या जागी कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) निवड करण्यात आली आहे असं बीसीसीआयने (BCCI) नमूद केले आहे.

वॉशिंग्टनला आज (मंगळवार, ता. १५ फेब्रुवारी) एनसीएमध्ये (National Cricket Academy) (nca) उपस्थित रहावं लागेल. त्यानंतर तेथेच त्याला तीन आठवडे रहावे लागतील. सुंदरने सध्या कोलकात्यात असलेल्या भारतीय छावणीतून बाहेर पडला. भारतीय संघाचे सोमवारी (१४ फेब्रुवारी) संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर सराव सत्र झाले (IND VS WI).

दरम्यान शनिवारी आयपीएल मेगा लिलावात, सुंदरला सनरायझर्स हैदराबादने 8.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

भारताचा T20I संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, रुतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव.

Edited By : Siddharth Latkar

washington sundar IND VS WI
Manika Batra: मनिका बत्राचे आरोप सिद्ध, प्रशिक्षक सौम्यदीप रॉय मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, महासंघाचे झाले निलंबन
washington sundar IND VS WI
Airtel Down: नेटीझन्सच्या टिवटिवनं Airtel ला आली जाग; पहा भन्नाट मीम्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com