इंडाेनेशिया : भारतीय युवा बॅडमिंटनपटू तस्नीम मीरने (Tasnim Mir) इंडोनेशियाच्या युलिया योसेफिन सुसांतोवर २१-११, ११-२१, २१-७ असा विजय मिळवून ३०व्या इराण फजर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन २०२२ चे (Iran Fajr International Badminton) विजेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत ४०४ व्या क्रमांकावर असलेल्या मीरने (tasnim mir) तुलनेने सहजतेने उच्च रँक असलेल्या इंडोनेशियनच्या (Indonesia) सुसांताेचा (Yulia Yosephine Susanto) पराभव केला. (Tasnim Mir Marathi News)
पहिलाच सेट मिरने २१-११ असा जिंकला. दुस-या सेटमध्ये मिरची एकाग्रता भंगल्याने तिने हा सेट गमावल्याने सुसांतोचा आत्मविश्वास वाढला हाेता. त्यानंतर मीरने पुन्हा शानदार पुनरागमन करीत आक्रमक खेळ करीत सामना खिशात घातला.
या स्पर्धेत (badminton) तसनीम मीरने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत तिने पहिल्या मानांकित आणि जागतिक क्रमवारीत ७१व्या स्थानी असलेल्या मार्टिना रेपिस्कावर (Martina Repiska) २१-१५, २१-६ असा सरळ सेटमध्ये अवघ्या २४ मिनिटांत विजय मिळवला हाेता. मिरने मिळविलेल्या यशामुळे क्रीडाक्षेत्रात (sports) विशेषत: बॅडमिंटनपटूंत चैतन्याचे वातावरण निर्माण झालं आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.