Hijab Controversy : हिजाब वादावारील याचिकेवर सरन्यायाधिश म्हणाले...

जर काही चुकीचे असेल तर आम्ही संरक्षण करू असं सरन्यायाधीश रमणा यांनी स्पष्ट केलं.
Hijab Controversy In Supreme Court
Hijab Controversy In Supreme CourtSaam Tv
Published On

दिल्ली : कर्नाटकातील (Karnataka) हिजाब (hijab) संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज तातडीची सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवली. सरन्यायाधीश एनव्ही रमणा (Chief Justice NV Ramana) यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत "आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप करू" अशी टिप्पणी केली. (hijab latest marathi news)

शाळा (school) आणि महाविद्यालयांमध्ये (college) हिजाब (hijab) बंदी असलेल्या प्रकरणावर निकाल येईपर्यंत उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना "धार्मिक वस्त्रे" परिधान करणे टाळण्याचा सल्ला दिल्यानंतर कर्नाटकातील (karnataka) एका मुलीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. "या गोष्टी राष्ट्रीय स्तरावर पसरवू नका. आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप करू," असे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना सांगितले. या खटल्याचा "दूरगामी परिणाम" आहे आणि विद्यार्थी 10 वर्षांपासून हिजाब किंवा डोक्यावर स्कार्फ घालत आहेत, असा युक्तिवाद करून वकिलाने न्यायालयात ते घेण्यास दबाव आणला, तेव्हा सर्वोच्च न्यायालय (supreme court) आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. (hijab latest marathi news)

Hijab Controversy In Supreme Court
Hijab Row: उच्च न्यायालयाच्या आदेशास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल; शिखांसारख्या अन्य समुदायांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर आघात

"कृपया मोठ्या स्तरावर पसरवू नका. आम्हाला माहित आहे की काय होत आहे. विचार करा, या गोष्टी दिल्लीत आणणे योग्य आहे का? राष्ट्रीय स्तरावर? जर काही चुकीचे असेल तर आम्ही संरक्षण करू असं सरन्यायाधीश रमणा यांनी स्पष्ट केलं.

महाविद्यालयांमधील हिजाबच्या निर्बंधांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी, तीन सदस्यीय खंडपीठाने सोमवारी पुन्हा सुनावणी सुरू करणार असल्याचे सांगितलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com