India vs South Africa, 1st T20I: न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला डरबनच्या मैदानावर रंगणार आहे.
या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिलं आहे. या संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार जाणून घ्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना डरबनच्या किंग्समीडच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर खेळलेल्या ५ पैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर एक सामना अनिर्णीत आणि एक सामना टाय झाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला सामना टी-२० आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहता येणार.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना तुम्ही जियो सिनेमावर लाईव्ह पाहू शकता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना हा स्थानिक वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होईल. तर नाणेफेक ८ वाजता होईल.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
दक्षिण आफ्रिका - एडेन मार्करम, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रिजा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, पेट्रिक क्रूगर, केशव महाराज,नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिल सिमलेन, लूथो सिपाम्ला, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना
असा आहे भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.