विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज का म्हणतात हे त्याने एकदा नाही, तर अनेकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये असा एकही रेकॉर्ड नसेल,जो विराट कोहलीच्या नावावर नसेल. आता पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
वनडे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ २ फलंदाज असे होते, ज्यांना वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावा करण्याचा पल्ला गाठता आला आहे. या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा यांचा समावेश आहे. या दोन्ही दिग्गज फलंदाजांना १४ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. मात्र आता विराटने १४ हजार धावा पूर्ण करताच मोठ्या रेकॉर्डमध्ये दोन्ही फलंदाजांना मागे सोडलं आहे.
विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने हा कारनामा आपल्या २८७ व्या डावात करुन दाखवला आहे. सचिनने हा कारनामा ३५० व्या डावात करुन दाखवला होता. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या कुमार संगकाराने हा कारनामा ३७८ व्या डावात करुन दाखवला होता.
विराट कोहली- २८७ डावात*
सचिन तेंडुलकर- ३५० डावात
कुमार संगकारा - ३७८ डावात
तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. सचिनच्या नावे १८४२६ धावा करण्याची नोंद आहे. तर कुमार संगकारा दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावे १४२३४ धावा करण्याची नोंद आहे. तर विराट आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने १३७०४ धावा केल्या आहेत. तर सनाथ जससूर्या पाचव्या स्थानी आहे. त्याने १३४३० धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकर - १८४२६ धावा
कुमार संगकारा- १४२३४ धावा
विराट कोहली- १४००० धावा
रिकी पाँटींग - १३७०४ धावा
सनाथ जयसूर्या - १३४३० धावा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.