भरत मागणे, साम टीव्ही
पंढरपूर: भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना हा केवळ दोन देशांपुरता मर्यादित नसतो, तर संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष लागलेले असते. या सामन्याच्या दिवशी क्रिकेटप्रेमी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून हा सामना पाहण्यासाठी उत्सुक असतात. भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव दीर्घकाळापासून सुरू असून याचा परिणाम दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यांवरही झाला आहे. अनेक वेळा हे सामने रद्दही करण्यात आले आहेत.
क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांपेक्षा अधिक उत्कंठा भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये असते. आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना रंगला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ते पंढरपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामने व्हायला हवेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशात जाऊन खेळले पाहिजे. खेळामध्ये राजकारण आणू नये. पूर्वी विरोध होत होता. मात्र तो आता थांबवला पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. तसेच आजची मॅच भारतच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा कुठलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध दिसत नाही. त्यांच्याविरोधात राजीनाम्याची मागणी होत असली, तरी राजीनामा देणे किंवा न देणे हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले
पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि स्काय वॉकसाठी मंजूर केलेल्या 130 कोटी रुपयांच्या निविदा रद्द करू नयेत, अशी मागणी आठवले यांनी केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रितपणे काम करीत असल्याने कोणतेही विकासकाम थांबवले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.तसेच कर्नाटकमध्ये पुन्हा मराठीविरोधी भावना उफाळून आल्या आहेत. यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावे आणि तात्काळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रकार थांबवावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.