Virat Kohli: रणवीर अलाहबादियाला विराट कोहलीने केले अनफॉलो; चाहते म्हणाले, 'लोकांनी तुझ्याकडून...'

virat kohli unfollow ranveer allahbadia : रणवीर अल्लाहबादियाने समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त प्रश्न विचारल्यानंतर त्याला ट्रॉलिंगचा सहन करावा लागत आहे.
virat kohli unfollow ranveer allahbadia
virat kohli unfollow ranveer allahbadiaSaam Tv
Published On

virat kohli unfollow ranveer allahbadia : रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये केलेल्या वक्तव्यपासून त्याला खूप ट्रॉलिंगचा सामना करावा लागत आहे. इन्फ्लुएंसरने एका स्पर्धकाला विचारला पालकांविषयाचा अपमानास्पद प्रश्न नेटिझन्सना आवडला नाही आणि अनेकांनी त्याला अनफॉलो करायला सुरुवात केली आहे. एका इन्फ्लुएंसर मार्केटिंग फर्मच्या अहवालानुसार, त्याने सुमारे ४०००० फॉलोअर्स गमावले आहेत.

दरम्यान, आता भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेही रणवीरला अनफॉलो केले आहे. विराटच्या फॉलोअर्स लिस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे आणि जेव्हा रणवीरला विराटच्या फॉलो लिस्टमध्ये शोधले तेव्हा नेटिझन्सना दिसले की या वादानंतर या विराटने त्याला अनफॉलो केले आहे. इन्स्टंट बॉलिवूड या मीडिया पोर्टलने हा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे नेटकाऱ्यानी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

virat kohli unfollow ranveer allahbadia
Sarang Sathye: रणवीर अलाहबादीया प्रकरणामुळे सारंग साठ्येचा 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो' गोत्यात; मनसेकडून शो बंदीचा इशारा

एका नेटकाऱ्याने लिहिले, "या पिढीसाठी काय चांगले आहे हे त्यांना माहित आहे." दुसऱ्याने म्हटले, " या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी विराटची पीआर टीम प्रयत्न करत आहे. अनेकांनी विराटचे कौतुकही केले. एका व्यक्तीने म्हटले, "चांगले काम केले विराट, मी तुझ्यासोबत आहे आणि लोकांनी तुझ्याकडून शिकले पाहिजे " एका चाहत्याने लिहिले, "किंग कोहलीचा आदर करा

virat kohli unfollow ranveer allahbadia
Akshay Kumar: ईदला सलमान खानसह अक्षय कुमार देणार चाहत्यांना मोठं सरप्राईज; या १८ सिलिब्रिटींसोबत येणार भेटीला

रणवीर, समय, अपूर्व मखीजा, आशिष चचलानी आणि 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे एक-दोन दिवसांत पोलिसांसमोर हजर राहून त्यांचे म्हणणे नोंदवण्याची अपेक्षा आहे. समय आणि रणवीर दोघांनीही माफी मागितली आहे आणि हा भाग आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. समयने असेही म्हटले आहे की तो पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com